बचतगटांच्या महिलांनी बनवले ५००० मास्क

पालघर करोना विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी बोईसर एमआयडीसी या औद्योगिक वसाहतीमधील लुपिन केमिकल आणि लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचतगटाच्या सहयोगाने ५००० मास्क बनवून त्याचे वाटप करण्यात आले. बोईसर परिसरातील नवापूर व सालवड या गावांतील बचतगटाच्या ६४ प्रशिक्षित महिलांना लुपिन फाउंडेशन तर्फे मास्क बनविण्याचे साहित्य देण्यात आले. सालवड येथील महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या.