वसई:वसई-विरार परिसरात लाकडाऊन झाल्यानंतर | अनेक स्थलांतरित कामगार, मजूर यांचे मोठे हाल झाले | आहेत. हातावर पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळच्या | अन्नासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशा निराधार आणि गरजू लोकांसाठी वसईत दररोज सकाळ-संध्याकाळ खिचडी बनवण्यात येत आहे. रोज चार हजार लोकांचे जेवण इथे बनत आहे. सेवाभावी संस्थेच्या माध्यामातून हे काम चालते. तर 'गरजूंनी या आणि मोफत खिचडी घेऊन जा,' असे आवाहन या संस्थेने केले आहे. ___
चार हजार जणांसाठी रोज बनतेय खिचडी